Amarnath Yatra 2024 : जम्मू आणि काश्मीरममध्ये मान्सून(Jammu and Kashmir Rain) दाखल होताच मुसळधार पाऊस पहायला मिळत आहे. त्यातच तेथे अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra)सुरू आहे. मुसळधार पावसाचा परिणाम अमरनाथ यात्रेवर होत आहे. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थोड्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. परिस्थीती सुधारताच यात्रा सुरू केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम आणि बालटल मार्गावरुन अमरनाथ (Amarnath)येथील पवित्र गुहेपर्यंत यात्रा तुर्त थांबवण्यात आली आहे. (हेही वाचा:Amarnath Yatra: 6,500 हून अधिक यात्रेकरूंचा नवीन ग्रुप अमरनाथ मंदिरासाठी रवाना )
पहलगाममध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. भाविकांसह तेथील स्थानिक नागरिकांसाठी हवामान त्रासदायक ठरत असल्याचे दिसते. अमरनाथ यात्रेला आलेल्या भाविकांमध्ये बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी मोठा उत्साह आहे. आत्तापर्यंत साधारण 21 हजारांहून अधिक आलेल्या भाविकांनी पवित्र अशा अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले.
सध्या पडणाऱ्या पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज लक्षात घेता प्रशासनाने अमरनाथ यात्रा सध्या स्थगित केली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान हवामान (weather)सुधारताच ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला आलेल्या प्रत्येक भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करुन ठेवली आहे शिवाय तेथे तात्पुरती रुग्णालयेही उभारण्यात आलेली आहे.अमरनाथ आलेल्या कोणत्याही भाविकाला नुनवान बेस कॅम्प या ठिकाणावरुन चंदनवारी अक्षमार्गे गुहेकडे जाण्याची परवानगी नाही.