Delhi: देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले असून, देशाच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. गुरुवारी देशाच्या पुढील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या (NSA) नावालाही मंजुरी देण्यात आली. अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. अजित डोवाल हे पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ संपेपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर राहतील.अजित डोवाल यांची 20 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डोवाल हे या पदावर आहेत. 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवाल हे राजनैतिक विचार आणि दहशतवादविरोधी तज्ञ मानले जातात, त्यांच्यापूर्वी शिवशंकर मेनन हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
पाहा पोस्ट:
Ajit Doval appointed as National Security Advisor for a third time, appointment co-terminus with PM Modi pic.twitter.com/TTLRotwQbB
— ANI (@ANI) June 13, 2024
यासोबतच निवृत्त आयएएस अधिकारी पीके मिश्रा यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांना ज्येष्ठता तक्त्यात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाणार आहे. पीके मिश्रा यांचा कार्यकाळही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूर्ण होणार आहे.