Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

ATF Price Hike: विमानाने प्रवास करणं आता प्रवाशांना महागात पडू शकतं. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा हवाई इंधनाच्या (Aviation Fuel) दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. या दरवाढीनंतर विमान इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. 2022 मध्ये विमान इंधनाच्या किमती 10व्यांदा वाढल्या आहेत.

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमानाच्या इंधनावरही परिणाम झाला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानीत एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. देशाच्या राजधानीत ATF ची किंमत 123,039.71 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच (123 रुपये प्रति लीटर) वर पोहोचली आहे. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला विमान इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. यावर्षी 1 जानेवारीपासून हवाई इंधन जवळपास 62 टक्क्यांनी महागले आहे. (हेही वाचा - PM Modi Nepal Visit: पंतप्रधान मोदी आज नेपाळ दौऱ्यावर; अनेक करारांवर होणार स्वाक्षरी)

कोलकाता आणि मुंबईत किंमत किती?

मुंबईत एटीएफची किंमत आता 121,847.11 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. तो कोलकात्यात 127,854.60 रुपये आणि चेन्नईमध्ये 127,286 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने गेल्या चार महिन्यांत हवाई इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातील विमान उद्योगाला सहन करावा लागू शकतो. महागड्या हवाई इंधनामुळे विमान कंपन्या भाडे वाढवत असून, त्याचा परिणाम विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर होत आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एटीएफच्या वाढत्या किमतींचा देशाच्या विमान उद्योगाच्या पुनर्प्राप्तीवर परिणाम होऊ शकतो.