अश्लिल व्हिडिओ पाहणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची अमेरिकेतून भारतात रवानगी
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

विमान कंपनी एअर इंडियाने (Air India) एका पायलटला लहान मुलांसंबंधित अश्लिल वस्तू डाऊनलोड आणि त्याबद्दलचे व्हिडियो पाहिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच अमेरिकेत  (America)विमान उतरल्यावर प्रवाशांसमोर त्याच्या हातात बेड्या टाकून त्याला विमानातून हकलावून दिले आहे.

ही घटना सॅनफ्रँन्सिस्को येथे झाली होती. अमेरिकेच्या प्रशासनाने या पायलटचा पासपोर्ट जप्त केला असून त्याचा व्हिजा रद्द करण्यात आला आहे. एवढच नसून त्याची भारतात पुन्हा रवानगी करण्यात आली आहे.(हेही वाचा-मृत व्यक्तीचा आत्मा घेऊन जाण्यासाठी तांत्रिकाकडून रुग्णालयात पूजा)

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पायलटच्या नावाबद्दल गुपप्ता पाळली आहे. तर सोमवारी जेव्हा दिल्ली-सॅनफ्रँन्सिस्को येथे निघालेल्या विमानातील पायलटला सर्वांसमोर बेड्या ठोठावल्या आहेत. या पायलटने चाईल्ड पोनोग्राफी आणि त्या संबंधित वस्तू डाऊनलोड केल्यामुळे एफबीआय सारखी कंपनी अशा लोकांवर नजर ठेवत असते.एअर इंडियाच्या प्रवक्ताने मात्र या संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला आहे.