(Photo Credits: Twitter)

गुजरातमध्ये (Gujarat Makar Sankarant) मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीपूर्वी अहमदाबाद पोलीस (Ahmedabad Police) अलर्ट मोडवर आहेत. शहरात कोणत्याही प्रकारच्या पतंग मांजाच्या विक्री, उत्पादन आणि वापरावर पोलिसांनी बंदी घातली आहे. आता नायलॉन, सिंथेटिक, ग्लास-लेपित आणि नॉन-बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनवलेल्या पतंगाच्या तारांवर अहमदाबादमध्ये बनवु शकत नाही किंवा विकता ही येणार नाही. यासोबतच पोलिसांनी त्याचा साठा आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अहमदाबादचे पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी शनिवारी रात्री याबाबत आदेश जारी केला. तसेच  8 जानेवारीच्या रात्री ते 15 जानेवारीपर्यंत (Ban On Risky Kite String) ही बंदी मांज्यावर लागु असेल असे सांगण्यात आले आहे.

यासोबतच भडकाऊ किंवा वाद होतील अश्या संदेश लिहिलेल्या पतंगांवरही बंदी घालण्यात आली असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर सणाच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या भावना दुखावणाऱ्या लाउडस्पीकर वाजवणे, विक्री आणि वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. (हे ही वाचा Gas Leak in Gujarat: गुजरात येथील सूरत गॅस गळती दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, 20 अत्यावस्त)

सार्वजनिक ठिकाणी पतंग उडवण्यास बंदी

छतावर आणि सार्वजनिक ठिकाणी पतंग उडवण्यास तसेच बांबू व मुलीच्या काठीने पतंग कापण्यासही १५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी पतंगाच्या सिंथेटिक, नायलॉन, काचेचा थर असलेला मांजा वापरल्यास लोकांना त्रास होऊ शकतो. या प्रकारच्या मांजाच्या वापरामुळे खूप दुखापत होते. तसेच, ते प्राण्यांसाठी देखील हानिकारक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कारवाईचे उल्लंघन केल्यास आरोपीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जर कोणी या सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आले तर आरोपींवर अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. तुम्हाला सांगतो की, पतंगाच्या मांजामुळे दरवर्षी लोकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळेच अहमदाबाद पोलीस याप्रकरणी कडक कारवाई करत आहेत. धोका निर्माण करणाऱ्या मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.