रामदेव बाबांचा भाजपला झटका; म्हणाले २०१९मध्ये राहणार मोदींपासून दूर
(सग्रहित आणि संपादित प्रतिमा)

योगगुरु रामदेव बाबा यांनी भारतीय जनता पक्षाला २०१९मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर चांगला दणका दिला आहे. २०१४ मध्ये आपण भाजप आणि पंतप्रधान मोदींना साथ दिली. मात्र, आगामी निवडणुकीत आपण राजकारणापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले, २०१९च्या निवडणुकांमध्ये आपण भाजपचा प्रचार करणार नाही. दरम्यान, आपल्याला माहितच असेल की, या आधी २०१४मध्ये झालेल्या देशभरातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये रामदेवबाबांनी भाजपचा जोरदार प्रचार केला होता. तसेच, भ्रष्टाचार, काळा पैसा, घराणेशाही आदी मुद्द्यांवरुन काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

राजधानी दिल्ली येथे फिक्की लेडीज ऑग्रनायझेशन (एलएलओ)च्या कार्यक्रमात रामदेवबाबा सोमवारी बोलत होते. ते म्हणाले, २०१९च्या निवडणुकीत ते कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नाहीत. निवडणुक काळात ते पूर्णपणे निरपक्षीय राहतील. दरम्यान, पतंजलिमध्ये विदेशी गुंतवणुकदाराला गुंतवणुकीसाठी मान्यता नाही, यावर बोलताना रामदेवबाबा म्हणाले, कोणत्याही विदेशी गुंतवणूकदाराला पतंजलित गुंतवणूक करण्यास मान्यता दिली जाणार नाही.

दरम्यान, २०१५ नंतर पतंजलि ही देशातील सर्वात मोठी एफएमसीजी (फास्ट मुव्हींग कंज्यूमर गुड्स) कंपनी बनली आहे. पतंजलि आता डेअरी क्षेत्रातही आल्याचे रामदेव बाबांनी सागितले. तसेच, ही कंपनी लवकरच वस्त्रनिर्मिती क्षेत्रातही उतरणार आहे. पतंजलि आता लवकरच आंतरराष्ट्रीय ब्रॅंडही बनले असा विश्वासही रामदेवबाबांनी या वेळी व्यक्त केला. सध्या नेपाळमध्ये पतंजलीचे केंद्र उघडले आहे. लवकरच बांदग्लादेश आणि भूतानमध्येही पतंजली सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.