Madhya Pradesh Crime: वर्षानुवर्षे केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर महिलेचा संयम सुटला; आरोपीवर 24 वेळा वार करत केली हत्या
(Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील एका महिलेने तिच्यावर वर्षानुवर्षे केलेल्या लैंगिक छळाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका युवकाची हत्या केली. या महिलेला कथित आरोपीला तब्बल 25 वेळा चाकूने वार करत ठार मारलं. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील गुना शहरात घडली. या महिलेने 2005 पासून मृत आरोपी तिच्यावर सतत बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी ती अल्पवयीन होती. या प्रकरणातील मृत युवकाचे नाव बृजभूषण शर्मा, असे आहे. हा मृत तरुण अशोकनगर जिल्ह्यातील रहिवासी होता. तसेच आरोपी महिलादेखील या जिल्ह्यातील रहिवासी आहे. या घटनेमुळे संपूर्ण अशोकनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

महिलेने सांगितले की, जेव्हा ती 16 वर्षांची होती, तेव्हा बृजभूषण शर्माने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर या युवकाने अनेक वेळा तिला धमकावून जबरदस्ती केली. शेवटी महिलेने एका शिक्षकाशी लग्न केले. लग्नानंतर महिलेला एक मुलगीही झाली. परंतु त्यानंतरदेखील बृजभूषण शर्माने महिलेचा पाठलाग करण सोडलं नाही. (हेही वाचा - मुंबई: जामिनासाठी पैसे नसल्याने आरोपीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी; शिवडी न्यायालयातील घटना)

दरम्यान, ज्या दिवशी आरोपीची हत्या करण्यात आली त्यादिवशी महिला घरात एकटी होती. त्यावेळी बृजभूषण रात्री तिच्या घरी आला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने महिलेसोबत जबरदस्ती केली. त्यामुळे महिलेचा संयम सुटला आणि तिने बृजभूषणवर तब्बल 25 वेळा चाकूने वार केले. महिलेने बृजभूषणच्या शरीरावर चाकूने इतके जोरदार वार केले की, त्याच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या. या घटनेत बृजभूषणचा मृत्यू झाला आहे. (वाचा - Thane: शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी दोन भावांना अटक; भिवंडी येथील घटना)

विशेष म्हणजे युवकाच्या हत्येनंतर महिलेने स्वत: पोलिसांना फोन करून आपला गुन्हा कबूल केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा बृजभूषणचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. बृजभूषणच्या मृतदेहातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. पोलिसांना बृजभूषणच्या मृतदेहा जवळच एक धारदार चाकूही सापडला आहे. या चाकूने महिलेने हत्या केल्याचं सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे.