Jharkhand Shocker: पलामूमध्ये 'निर्भया'सारखे कृत्य; पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला 7 टाके; अंगभर जखमा
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Jharkhand Shocker: झारखंड (Jharkhand) मध्ये हुसैनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. पीडितेची प्रकृती गंभीर आहे. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा ओलांडली आहे. पीडितेचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) फाटला आहे. पीडितेवर मेदिनी राय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (MRMCH) उपचार सुरू आहेत. सामूहिक बलात्कारादरम्यान तिचा प्रायव्हेट पार्ट फाटला होता. उपचारादरम्यान सात टाके घालण्यात आले आहेत.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, सामूहिक बलात्कारादरम्यान आरोपींनी तिच्यावरही अत्याचार केला. तिच्या छातीवर, पाठीवर आणि पोटावर खोलवर जखमा झाल्या आहेत. दुसरीकडे या प्रकरणातील पाच आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. (हेही वाचा -भाजप नेत्याने मोडला मुलीचा आंतरधर्मीय विवाह, सोशल मीडियावरील टीकेनंतर घेतला निर्णय)

हुसैनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सहा तरुणांनी एका दलित मुलीचे घरातून अपहरण करून तिला शेतात नेले. यानंतर त्यांनी पीडितेवर बलात्कार केला. मुलीने विरोध केला असता आरोपीने तिच्यावर बेदम मारहाण केली. तरुणाने बलात्काराचा व्हिडिओही बनवल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आरोपी दिनेशकुमार ठाकूर याला पकडून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाच आरोपी अद्याप फरार आहेत. पीडितेच्या आईने सहा तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पीडितेवर एमआरएमसीएच मेदिनीनगर येथे उपचार सुरू आहेत. मुलीच्या प्रायव्हेट पार्टला झालेली जखम गंभीर आहे. उपचारासाठी डॉक्टरांचे पाच सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. यात डॉ.आर.के.रंजन, डॉ.विजेता सिंग, डॉ.जयंत घोष, डॉ.आशिष आणि आणखी एकाचा समावेश आहे.

रक्तस्रावामुळे मुलीची प्रकृती चिंताजनक -

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हुसैनाबादचे एसडीपीओ पूज्य प्रकाश यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी पोलिस संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.