Actor Suraj Mehar Dies In Road Accident: चित्रपटाचं शुटिंग संपवून घरी जात असताना, रायपूरमध्ये एका कारचा अपघात झाला. या अपघातात एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. पिकअप ट्रकच्या धडकल्याने अपघात घडून आला. अभिनेता सूरज मेहरला आपला जीव गमवावा लागला. धक्कादायक म्हणजे सूरज यांचा साखरपूडा होता आणि साखरपूडाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर छत्तीसगड चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा- महेंद्रगड येथे भीषण अपघात, स्कूल बस पलटल्याने पाच मुलांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं शुटिंग संपवून घरी जात असताना कारचा अपघात झाला. कारला पिकअप ट्रकची धडक लागली. अपगात हा सांयकाळी पाच वाजता झाला आहे. रसिवा भागातून पायपीडुलाजवळून येणाऱ्या पिकअप ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सूरज हा 40 वर्षाचा होता. आखरी फैसला या चित्रपटाचं शूटींगवरून घरी जात होते तेव्हा हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, सूरज यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रक्त बंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात एका चालक आणि आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहे. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील वैद्यकिय उपचारासाठी बिलासपूर येथे रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती सूरज यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज यांच्या मृत्यूनंतर अनेक कलाकरांनी शोक व्यक्त केला आहे.