Haryana Accident: महेंद्रगड येथे भीषण अपघात, स्कूल बस पलटल्याने पाच मुलांचा जागीच मृत्यू
हरियाणा येथील महेंद्रगडी परिसरातील कनिना येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Haryana Accident: हरियाणा येथील महेंद्रगडी परिसरातील कनिना येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उनहनी गावातून शाळेची बस जात असताना बस उलटली. या अपघातात पाच मुलांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना देताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या घटनेची तपासणी करत आहे. अपघातात अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. हा अपघात ओव्हरटेकींमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना बस चालकाला ताब्यात घेतले आहे. बस चालक दारूच्या नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- रस्ता ओलांडताना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकाचा अपघात)
हरियाणा में स्कूल बस पलटी
कई बच्चों की मौत होने की ख़बर-सूत्र#Haryana #Schoolbus #accident #NarnaulAccident #SchoolChildren pic.twitter.com/Hv2NBwEZz3
— Parkash Fulara प्रकाश फुलारा (@Fulara_Parkash) April 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2024 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

