Mumbai Accident: मुंबईतील घाटकोपर येखील पंत नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 56 वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकाला एका ऑटोरिक्षाने धडक दिली आहे. बुधवारी दुपारी पोलिस ठाण्यातून घरी जात असताना ही घटना घडली. ASI संदीप चांदणे असं अपघात झालेल्या पोलिसाचे नाव आहे. धडक देणाऱ्या ऑटोरिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.( हेही वाचा- ग्रुमिंग सेंटरवर कर्मचाऱ्याने केली कुत्र्यांवर अत्याचार, विचलित करणारा Video आला समोर
मिळालेल्याम माहितीनुसार, बुधवारी दुपारी पोलिस अधिकारी संदिप चांदणे घरी जात होते. तेव्हा रस्ता ओलांडत असताना पुढे जाऊन भरधाव रिक्षाने धडक दिली. पोलिस स्टेशनच्या बाहेर रस्ता वर्दळीचा होता. रिक्षा भरधाव होती आणि ब्रेक लावण्याच्या आत धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, संदीप हे काही अंतरावर दुर फेकले गेले. जमिनीवर डोके आपटल्याने त्याच्या कवटीला आणि शरिराच्या काही भागाला दुखापत झाली. रिक्षा - एमएच 02 एफबी 3085 असं रिक्षाचा नंबर आहे.
अपघात पाहून लोकांनी गर्दी केली. अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात असलेले वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश केवले यांनी तात्काळ संदिप यांना शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चांदणे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. या अपघातानंतर पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.