कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी. (संग्रहित छायाचित्र, Photo Credits: PTI))

भाजप पक्षाने 'द अॅक्सिडेंटल चीफ मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला. मात्र कर्नाटकातील भाजपने या चित्रपटावरुन तेथील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. हा चित्रपट बनविण्यात आला खरा, परंतु चित्रपटातील मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (H.D. Kumaraswamy) यांची भुमिका कोण पार पाडणार? असे विचारण्यात आले आहे.

कर्नाटक (Karnataka) मध्ये काँग्रेच्या पाठिंब्यामुळे जेडीएस (JDS) चे पक्षनेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांना मुख्यमंत्र्यांचे पद दिले आहे. तसेच मनुष्यबळ कमी असून ही भाजपच्या पक्षाला सत्ता येऊन दिली नाही. मात्र काँग्रेसने तडजोड करुन भाजपला सत्तेत येण्यापासून दूर ठेवल्याने कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळेच भाजपने काँग्रेसवर टीका करत चित्रपटातील सीएम पदासाठी कुमारस्वामी यांचे नाव घेत खिल्ली उडविली आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झालाा. तर जेडीएस पक्षाला 37 जागा कर्नाटकमध्ये मिळाल्या आहेत. त्यामुळे द अॅक्सिडेंडल चीफ मिनिस्टर म्हणून कुमार स्वामी यांची नक्कल करण्यात आली आहे.