Accident While Insta Live PC TWITTER

Accident Video:  अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असतात. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. कारची स्पीड वाढवून स्टंट करणे तरुणांना चांगलल बेतले आहे.  इन्स्टाग्रामचे लाईव्ह सुरु असताना हा विचित्र अपघात झाला आहे. भरधाव कारच्या ( Car Accident) अपघातात दोन जणांनी आपले प्राण गमावले आहे. हा अपघात वसद येथे घडला आहे. अपघाताचा संपुर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा-पाळीव कुत्रा घरात शिरला म्हणून चिडला शेजारी; प्राण्याच्या मालकासह पत्नीवर केला लाठी हल्ला, घटना CCTV मध्ये कैद (Watch)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. पाच प्रवाशी अहमदाबाद वरून मुंबईच्या दिशेने येत होते. तरुणांनी कारमध्ये गाण लावून धिंगाणा घालत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तरुणांनी लाईव्ह सुरु केले होते आणि त्यानंतर कार वेगवेगान स्पीडने चालवली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, अनेक वाहनांना ओव्हरटेक करून जात होती. कारचा स्पीड वाढवून कार चालवणे दोघांच्या जीवाशी बेतले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

१६०च्या स्पीडने कार जात असताना भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार अक्षरश: चक्काचूर झाली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे दिसून आले. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. या अपघातात अमन मेहबुबभाई  शेख आणि चिरागकुमार के. पटेल या दोघांचा मृत्यू झाला आणि कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर जवळच्या उपचार सुरु आहे. निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे