Karnataka Shocker: रात्रीचे जेवण न दिल्याने कर्नाटकातील तरुणाने सोलली पत्नीची कातडी, शिरच्छेद करत केलं क्रूर कृत्य
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Karnataka Shocker: कर्नाटकातील (Karnataka) तुमकूर येथील एका व्यक्तीने पत्नीने जेवण न दिल्याने तिचा खून केला. याप्रकरणी आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपीने पत्नीची हत्या (Murder) करून तिचा शिरच्छेद केला. तसेच तिच्या शरीराची कातडी काढली. आरोपीच्या घरात पडलेल्या दृश्यांमध्ये महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तसेच तिच्या पतीने तिची त्वचा सोललेली असल्याने तिच्या नसा आणि आतडे दिसत होते. तिचे कापलेले डोके तिच्या शरीराशेजारी ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुनिगल तालुक्यातील हुलीयुरुदुर्गा शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली. आरोपी शिवरामा आणि त्याची पत्नी पुष्पलथा (35) हिच्याशी नियमित वाद होत होते. सोमवारी रात्री पुष्पलथाने आपल्या पतीला जेवण न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. शिवरामाच्या नोकरीवरून त्यांच्यात भांडण वाढले. (हेही वाचा -Delhi Murder CCTV Video: दिल्लीत 32 वर्षीय व्यावसायिकाची दुकानात गोळ्या झाडून हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video))

क्रोधित होऊन शिवरामाने पुष्पलथावर चाकूने वार केले आणि नंतर तिचे डोके कापून तिच्या शरीराचे काही भाग विकृत केले. मंगळवारी पहाटेपर्यंत त्याने तिच्या शरीराची त्वचा काढली आणि आपल्या घरमालकाला त्याच्या गुन्ह्याची माहिती दिली. या भीषण कृत्यावेळी दाम्पत्याचा आठ वर्षांचा मुलगा झोपला होता.

तुमकूरचे पोलिस अधीक्षक अशोक व्यंकट यांनी सांगितले की, घटनास्थळी एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. तिचा नवराही घटनास्थळी होता. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली. आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. शिवराम आणि पुष्पा यांचा 10 वर्षे आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. काल त्यांच्यात नोकरीच्या मुद्द्यावरून भांडण झाले होते. त्याने पत्नीची हत्या करून त्याच्या मालकाला कळवले. त्यांनी लगेच आम्हाला कळवले. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.