Delhi Murder CCTV Video: दिल्लीत 32 वर्षीय व्यावसायिकाची दुकानात गोळ्या झाडून हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
Delhi Murder CCTV Video (PC - PTI)

Delhi Murder CCTV Video: ईशान्य दिल्लीत बुधवारी सकाळी एका 32 वर्षीय व्यावसायिकाची त्याच्या दुकानात गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. वृत्तानुसार, कबीर नगर, वेलकम येथील अहलावत बिल्डिंगजवळील दुकानात एका व्यक्तीने प्रवेश करून गोळीबार केल्याची घटना सकाळी 8:40 वाजता घडली. हर्ष विहार येथील रहिवासी असलेला मृत व्यक्ती टॅप फिटिंग आणि पॉलिश विकण्याचा छोटा व्यवसाय करत होता.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी सोशल मीडियावर समोर आले आणि सध्या ते व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुकानात घुसून सूरजच्या दिशेने चार गोळ्या झाडताना दिसत आहे. हा व्यक्ती स्कूटरवरून घटनास्थळी आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (हेही वाचा -Bulandshahr: बुलंदशहर येथील पोलीस ठाण्याच्या आवारात उष्णतेमुळे बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल)

पहा व्हिडिओ -

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या गोळीबारात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही अहवालांमध्ये असेही सूचित केले जाते की, ही घटना ऑटो चालकांकडून खंडणीसाठीच्या शत्रुत्वाचा परिणाम आहे. सुरजच्या मित्रावर महिन्याभरापूर्वी हर्ष विहारमध्ये गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त आहे.