A woman beaten by police Photo Credit TWITTER

Telangana Video: तेलंगणातील करीमनगर येथील पोलिस ठाण्यासमोर एका पोलिस कर्मचाऱ्याने महिलेला काठीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरगुती भांडण झाल्यानंतर पीडित महिला पती सोबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास आली होती. त्यावेळीस पोलिस हवालदाराने महिलेला काठीने मारहाण केली. (हेही वाचा-  नोएडात 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा; विद्यापीठातील 39 विद्यार्थी ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादविवाद झाल्यानतंर महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास आली होती. परंतु पोलिस ठाण्यात देखील पती पत्नीचे जोरजोरात भांडण सुरु झाले. पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरु केली. त्याचा शर्ट खेचून त्याला मारत असल्याचे व्हिडिओत दिसले. त्या दोघांचे भांडणात मद्यस्थी करण्यासाठी पोलिस ठाण्यातून पोलिस बाहेर आले. त्याने भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेने एक ऐकले नाही. त्यामुळे एका पोलिसांने महिलेला लाठीने मारहाण केली. तर दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने तीला धक्का दिला.

पाहा व्हिडिओ 

ही घटना एकाने लांबून फोनमध्ये कैद केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पीडित महिलेने कुटुंबाच्या मदतीने मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर तक्रार दाखल केली आहे.