Suicide: लिव्ह इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या, 14 वेळा केला होता गर्भपात
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दक्षिण पूर्व दिल्लीतील (Delhi) जैतपूर (Jaitpur) भागात एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सुसाइड नोटमध्ये (Suicide note) महिलेने आत्महत्येचे कारण तिच्या लिव्ह इन पार्टनर सांगितले आहे. सुसाइड नोटमध्ये महिलेने आरोप केला आहे की, तिच्यावर 8 वर्षांपासून सतत बलात्कार झाला आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरने 14 वेळा गर्भपात केला. या महिलेने 5 जुलै रोजी आत्महत्या केली होती. पोस्टमॉर्टमदरम्यान डॉक्टरांच्या टीमला एक सुसाइड नोट सापडली आहे. सुसाइड नोटमध्ये महिलेने तिच्या लिव्ह इन पार्टनरने 14 गर्भपात केल्याचा आरोप केला आहे. खरं तर, 5 जुलै रोजी दिल्लीतील जैतपूर भागात एका महिलेच्या आत्महत्येची बातमी पोलिसांना मिळाली.

घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. सुरुवातीला पोलीस याला आत्महत्या मानत होते, मात्र 7 जुलै रोजी महिलेचे पोस्टमार्टम केले असता डॉक्टरांच्या पथकाला सुसाईड नोट सापडली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. सुसाईड नोट मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बलात्कार या कलमांखाली गुन्हा दाखल केला. हेही वाचा Women On Social Media: सोशल मीडियावर सक्रिय महिलांकडे दुर्लक्ष करून आपली मानसिकता बदला - कोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे वय 33 वर्षे आहे. महिलेचे लग्न झाले होते आणि ती सुमारे 9 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. महिलेची दोन मुले वसतिगृहात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नोएडातील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे.