Andhra Pradesh मध्ये चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर प्रेमी युगुलाचा मिठी मारताना व्हिडिओ व्हायरल, दोघांना अटक
Arrested

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर एक महिला बसून त्या पुरुषाला मिठी (Hug) मारताना दाखविणारा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका जोडप्याला अटक (Arrested) करण्यात आली. हा व्हिडिओ विशाखापट्टणमच्या स्टील प्लांट रोडचा असल्याचा दावा केला जात आहे, जो कारमध्ये बसलेल्या अन्य व्यक्तीने शूट केला आहे.

के शैलजा असे महिलेचे नाव असून अजय कुमार असे पुरुषाचे नाव आहे. ही बाब विशाखापट्टणम पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेचच या जोडप्याला पकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून स्टील प्लांट पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. हेही वाचा Leopard Cubs Reunion With Mother: गोंदिया मध्ये आईपासून दुरावलेल्या 2 बछड्यांची वनविभागाने पुन्हा घडवून आणली भेट (Watch Video) 

पहा व्हिडिओ

पोलिसांनी कलम 336, 279, 132 आणि 129 मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांच्या पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त सी.एच.श्रीकांत यांनी दिली. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला असून त्यात त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.