
Indore Accident: मध्य प्रदेशातील परदेशीपूरा पोलिस स्टेशन हद्दीत रस्ता ओलांडताना भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने 22 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला अशी माहिती मिळाली आहे. ही घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मालवा मिल- पाटणीपूरा स्क्वेअर रोड येथे घडला. अपघात झाल्यानंतर दोघांना स्थानिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले परंतु वेळ निघून गेली आणि एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. (हेही वाचा- सहलीसाठी निघालेल्या बसचा भिवंडीत अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)
मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडताना भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ऋषभ पालीवाल असं या मृत तरुणाचे नाव आहे. तो राजगड येथील रहिवासी असून नेहरू नगरमध्ये भाड्याने राहत होता. ऋषभ शहरातील महाविद्यालयात बीबीएचा विद्यार्थी होचा. ऋषभ आणि त्याचा मित्र रात्रीचे जेवण करून ऑटोने परतत होता. ते दोघेही मेन रोडवर उतरून रस्ता ओलांडत असताना, माळवा मिलच्या बाजून पटनीपूरा चौकाकडे जाणाऱ्या भरधाव मोटारसायकलने त्यांना धडक दिली. अपघातानंतर ऋषभचे डोके दुभाजकावर आदळले.यात त्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासले. ऋषभ आणि त्याच्या मित्राला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत असून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात येणार आहे.