Thane Accident: सहलीसाठी निघालेल्या बसचा भिवंडीत अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Accident (PC - File Photo)

Thane Accident: ठाण्यातील भिवंडी बायपास रोडवर शालेय बस दुसऱ्या वाहनाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सोमवारी सायंकाळी .5.30 च्या सुमारास ही घटना होती. दोन्ही वाहनांच्या धडकेतून 50 विद्यार्थी बचावले आहे. पडघा पोलिस ठाण्याचे निरिक्षक बी. आर. कुंभार यांनी याची माहिती दिली. या मधून विद्यार्थी नाशिकच्या वाडिवरे माध्यमिक विद्यालय येथील आहेत. शाळेतून ठाण्यातील उद्यानात पिकनीक घेऊन जात असताना ही घटना घडली. हेही वाचा-सोलापूरात भरधाव दुचाकी झाडावर आदळली; 3 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बसच्या समोरुन येणाऱ्या अवजड वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने स्कूल बस त्याच्यावर धडकली. अवजड वाहन चालकाविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. स्कूल बस चालकाने दोन वाहनावर नियत्रंण राखलं म्हणून मोठा अनर्थ टळला. तरीही धडक इतकी भीषण होती वाहनांते नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. मुलांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले.

समोरून जात असलेल्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थांना दुसऱ्या बसची व्यवस्था केल्याने ते पुढे सुखरुप जाऊ शकले. या अपघातानंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली.