Solapur Accident: सोलापूरात भरधाव दुचाकी झाडावर आदळली; 3 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

सोलापूरमधून भीषण अपघाताची (Solapur Accident) घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील (Solapur City) महावीर चौकात काल रात्री दुचाकी झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. जुळे सोलापूर भागात राहणारे इरण्णा मठपती,निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी हे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या पल्सर गाडीवरुन घरी जात होते. शहरातील महावीर चौकात त्यांची गाडी झाडावर आदळली.  (हेही वाचा - Ahmednagar-Sambhaji ExpressWay Accident: पांढरी पुलावर कंटेनरची स्कूटीच्या धडक, अपघातात चौघांचा मृत्यू)

मृत पावलेल्या मुलांपैकी इरण्णा मठपती या तरुणाचा वाढदिवस होता. यानिम्मीतांने तीघे गाडीवर बसून जात असताना हा अपघात घडला. या अपघातात तरुणांच्या डोक्याला जबर जखम लागल्याने ते जागेवरच ठार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या त्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी केली आहे.

दरम्यान अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जानेवारी (28 जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.  भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतक्या जोरात होती की, चौघांचा जागीच मृत्यू झाला.