Noida Audi Car Accident: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातासारखीच एक घटना उत्तर प्रदेशातील नोएडात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी सकाळी लक्झकी कारने रस्त्यावरून जात असताना एका वृध्द व्यक्तीला धडक दिली. ही घटना समोरच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडक दिल्याने पीडित व्यक्ती हवेत काही फुट फेकला गेला आणि भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरुच आहे. (हेही वाचा- बिजनौरमध्ये दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या ट्रकचा अपघात; जखमींची मदत करण्याऐवजी लोकांनी सुरु केली लुट)
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडातील सेक्टर 53 मधील कांचनजंगा अपार्टमेंटजवळ रविवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जनक देव शहा असं अपघातात मृत झालेल्या व्यक्तीने नाव आहे. जनक सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस हा अपघात घडला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ऑडी कारने जनक यांना धडक दिली. ऑडी कार भरधाव वेगात होती. ही धडक इतक्या भीषण होती की, जनक हे काही फुट उंचावर उडाले.
UP : नोएडा में ऑडी कार ने जनक देव नामक बुजुर्ग को टक्कर मारकर हवा में उड़ाया, मौत हुई। pic.twitter.com/KXj2Z7uJ4O
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 26, 2024
जमिनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ऑडी कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. जनक यांचा मृतदेह जमिनीवर पडून राहिला. बराच वेळ घरी न आल्यामुळे कुटुंबांनी त्यांचा शोध घेतला तेव्हा जनक हे रस्त्याच्या मधोमद रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. त्यांनी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबानी अपघाताची तक्रार दाखल केली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. पोलिस या घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. आरोपीली शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही.