sixth flight from Israel arrived in Delhi (PC - Twitter)

Operation Ajay: इस्रायल-हमास संघर्षादरम्यान (Israel-Hamas Conflict) ऑपरेशन अजय (Operation Ajay) अंतर्गत, नेपाळच्या दोन नागरिकांसह 143 लोक रविवारी विशेष विमानाने भारतात परतले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी X वर पोस्ट करताना सांगितले की, 'ऑपरेशन अजेय'चे सहावे विमान नवी दिल्ली विमानतळावर उतरले. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी विमानतळावर प्रवाशांचे स्वागत केले.

यापूर्वी, नेपाळच्या 18 नागरिकांसह 286 भारतीयांना घेऊन पाचवे विमान मंगळवारी रात्री उशिरा नवी दिल्लीला पोहोचले. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या शहरांवर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर इस्रायलमधून भारतीयांना परतण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी 'ऑपरेशन अजय' सुरू करण्यात आले होते. 'ऑपरेशन अजय' अंतर्गत आतापर्यंत 1300 हून अधिक लोक भारतात परतले आहेत. (हेही वाचा - Israel-Hamas War: भुकेने त्रस्त गाझातील लोकांप्रती भारताने दाखवली माणूसकी; अन्न आणि औषधांनी भरलेले विमान पाठवले)

इस्रायलमध्ये मारल्या गेलेल्या चार नेपाळी विद्यार्थ्यांचे मृतदेह काठमांडूत आणण्यात आले आहेत. हमासच्या हल्ल्यात नेपाळमधील 10 विद्यार्थी ठार झाले होते. सहा मृतदेहांची ओळख पटलेली नाही.