Uttar Pradesh: राजभवनच्या गेटबाहेर गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म; रुग्णवाहिका न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू; Watch Video
pregnant woman gave birth to a baby outside the road (PC - Twitter)

Uttar Pradesh: लखनौमधील राजभवनाबाहेर एका महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. तेथील लोकांनी अनेकदा फोन करूनही रुग्णवाहिका (Ambulance) वेळेत पोहोचली नाही. अखेर महिलेचा गर्भपात झाला. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Deputy CM Brajesh Pathak) यांनी याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. नागरी वैद्यकीय सुविधा आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक आरोग्य सुविधांच्या अभावावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेला रस्त्यातच बाळाची प्रसूती करावी लागली. नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

झोपडपट्टीतील रहिवासी ब्रजेश सोनी टिटू यांची पत्नी रूपा (वय, 30) ही पाच महिन्यांची गरोदर होती. रविवारी सकाळी तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला झलकारीबाई रुग्णालयात नेले. येथे त्यांना कोणी तपासले नाही. रात्री 11.45 च्या सुमारास रिक्षाने मॉल एव्हेन्यूच्या घरी परतत असताना रुपाला राजभवनाजवळ प्रसूती वेदना होऊ लागल्या. तेथे एका व्यक्तीने रुग्णवाहिका सेवेला फोन केला. मात्र, बराच वेळ तेथे रुग्णवाहिका पोहोचली नाही. (हेही वाचा - Leopard Attack in Andhra Pradesh: तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा बिबट्याने घेतला बळी, पहा व्हिडिओ)

महिलेचा रस्त्यातच गर्भपात झाला. माहिती मिळताच चौकी इन्चार्ज भानू प्रताप सिंह लेडी कॉन्स्टेबल मृदुला आणि इतर पोलिसांसह पोहोचले. त्यांच्या आगमनानंतरच 108 क्रमांकाची रुग्णवाहिका पोहोचली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तिच्या वहिनी आणि कॉन्स्टेबलसह घेऊन त्यांनी झलकारीबाई हॉस्पिटल गाठले. घटनास्थळी एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. पोलिसांनी महिलेला लेबर रूममध्ये नेले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असं ब्रजेश पाठक यांनी सांगितलं आहे.