High Court Judge On Cow Slaughter: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने गोहत्येवर ( Cow Slaughter) कठोर टिपण्णी केली आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांचा हवाला देत खंडपीठाने म्हटले की, गायीला मारणारा माणूस नरकात सडतो. गोहत्येवर बंदी घालण्यासाठी आणि त्याला संरक्षित प्राणी घोषित करण्यासाठी देशभरात कायदा करावा, असेही खंडपीठाने केंद्र सरकारला सांगितले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीन अहमद यांनी गोवंश हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने सर्व धर्मांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. न्यायमूर्ती अहमद म्हणाले की, हिंदू धर्मासह सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. (हेही वाचा -UP Cow Slaughter: गोवंश हत्येतील आरोपीचा बचाव करणे यूपी पोलिसांना पडले महाग, 4 पोलिसांचे केले निलंबन)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे की, न्यायालयाने बाराबंकीतील एका व्यक्तीविरुद्ध गायीची हत्या आणि मांस विकल्याच्या आरोपाखाली दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. त्याचबरोबर गोहत्या बंदीसाठी कायदा आणावा आणि गायीला 'संरक्षित राष्ट्रीय प्राणी' म्हणून घोषित करावे, असेही न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे.
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुध्दीकरण आणि तपश्चर्यासाठी गाईचे महत्त्व अधोरेखित केले. जुन्या समजुती आणि परंपरांचा हवाला देत न्यायालयाने सांगितले की, गायीचे पाय चार वेदांचे प्रतीक आहेत आणि तिची शिंगे देवतांचे प्रतीक आहेत, तिचा चेहरा सूर्य आणि चंद्र आणि तिचे खांदे अग्नी आहेत.