UP Cow Slaughter: गोवंश हत्येतील आरोपीचा बचाव करणे यूपी पोलिसांना पडले महाग, 4 पोलिसांचे केले निलंबन
Cow | (Photo Credits: (Pixabay) Representational Image Only

फतेहपूरमधील (Fatehpur) एका गोहत्येच्या (Cow slaughter) आरोपीला (Accused) वाचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार पोलिस (Police) कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना युपीमध्ये (UP) घटली आहे. पोलिस अधीक्षक राजेश कुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणात चार पोलिसांविरुद्ध कारवाई केली आहे. उपनिरीक्षक शमी अशरफ आणि अनीश कुमार सिंह, हेड कॉन्स्टेबल मनोज कुमार आणि कॉन्स्टेबल राजेश तिवारी यांच्यावर गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणि सर्कल ऑफिसरच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली, असे एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, चौघांनी खाखरेरू पोलीस स्टेशन (Khakharru Police Station) परिसरातील गोहत्या प्रकरणातील आरोपी हैदरला वाचवण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा Assam: कलियुग! तीन मुलांची आई गेल्या दहा वर्षांत 25 जणांसोबत पळून गेली; पती म्हणतो- 'पुन्हा स्विकारायला तयार आहे'

कथित गोहत्येची घटना गुरुवारी घडली आहे.  एसपी म्हणाले की, सर्कल ऑफिसर संजय सिंह यांनी केलेल्या तपासात त्यांच्यावरील आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांना निलंबित करण्यात आले. देशात गोवंश हित्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे गोवंश हत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.