Photo Credit: X

Train Accident in Bihar: बिहारमधील समस्तीपूरमध्ये सोमवारी(आज) मोठा रेल्वे अपघात होता- होता टळला. दरभंगाहून नवी दिल्लीला जाणारी बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस ट्रेन दोन भागात  विभागली गेली ट्रेन चे डब्बे इंजिन पासून वेगळे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. समस्तीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे विभागातील खुदीराम बोस पुसा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून डबे इंजिनला जोडण्यास सुरुवात केली.हेही वाचा: Kolkatta Car Collides With Express Train: रेल्वेरूळ क्रॉस करताना भरधाव ट्रेनची कारला धडक, थोडक्यात वाचला जीव, घटना CCTV कैद

या घटनेमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी लवकरच परिस्थिती सामान्य केली. या अपघातानंतर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोको पायलटने अगदी वेळेवर हुशारी दाखवत ट्रेन थांबवली आणि जवळच्या स्टेशन मास्टरला कळवले. यानंतर टेक्निकल टीमने घटनास्थळ गाठून रेल्वेचे तुटलेले कपलिंग दुरुस्त करून पुढे पाठवले.

 

ट्रेन चे डब्बे इंजिन पासून वेगळे झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांचीही गर्दी देखील झाली होती. सोनपूर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंजिन आणि डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, ट्रेनची दुरुस्ती करून ती ट्रेन नंतर दिल्लीला रवाना करण्यात आली आहे.