Delhi Metro Viral Video: दिल्लीच्या मेट्रोत दारूच्या नशेत तरुण चढला लेडिज कोचमध्ये, पाहा पुढे काय झालं
Delhi Metro PC TWITTER

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो म्हटलं की हाणामारी, मारामारीचे ठिकाण. दिल्लीची मेट्रो नेहमीच चर्चेसाठी राहिली आहे. मेट्रोच्या आत नेहमीच भांडण होत असताचे व्हिडिओ पाहत आलोय. दरम्यान एका लेडीज कोचमध्ये अशी घटना घडली आहे त्यामुळे मेट्रो चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीच्या मेट्रोत एक तरुण दारू पिऊन महिलांच्या कोचमध्ये बसला आहे. (हेही वाचा- आजोबांना राईड देण्याची माझी वेळ)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मद्य धुंद अवस्थेत असलेला तरुण महिलांच्या कोचमध्ये बसला आहे. या घटनेनंतर महिलांनी तेथून जायला सांगितले. परंतु दारू प्राशन केलेल्या तरुणाने या क्षुल्लक गोष्टीमुळे महिलांशी वाद सुरु केला. ही घटना एकाने व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. सीटवर बसलेल्या एका महिलांने सांगितले की, हा लेडीज कोच आहे तुम्ही येथे कसे आले? असं बोलत त्याला जर्नलमध्ये प्रवास करण्यास सांगितले. मात्र त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने एक ऐकलं नाही.

उपस्थित महिलांसाठी वाद घालू लागला. लेडीजप्रमाणे जेन्ट्स कोच देखील बनवला पाहिजे. असं ही हा व्यक्त बोलतो. त्यानंतर तो तेथून निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला अनेकांनी कंमेट केले होते. त्यानंतर एकाने लिहलं होत की, दिल्ली मेट्रोत असं नेहमी घडत असत. तर दुसऱ्याने लिहलं की, दारू पिल्यास अशा व्यक्तींना मेट्रो ट्रेनमध्ये एन्ट्री देऊ नये.