Mysore Rape Case: म्हैसूरमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या 23 वर्षीय तरूणीवर एका व्यक्तीने केला बलात्कार, पोलिसाकडून अधिक तपास सुरू
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

म्हैसूरमधील (Mysore) महिला वसतिगृहात एका 23 वर्षीय महिलेवर एका ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून आरोपी धार्मिक अभ्यास केंद्राचा चालक आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला एकटे पाहून बलात्कार केला. तसेच अत्याचार केल्यानंतर आरोपी फरार होण्यापूर्वी तिला चाकूने जखमी केले. तिचे वसतिगृहातील (Hostel) साथीदार परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, पीडित आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. कायदा व सुव्यवस्थेचे डीसीपी प्रदीप गुंटी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. त्यांनी पीडितेचे मित्र आणि वसतिगृहातील सहकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.

म्हैसूर आयुक्त चंद्र गुप्ता यांनी सांगितले की, बलात्काराचा गुन्हा नरसिंहाराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी पीडितेला ओळखत असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले, पीडितेने सुरुवातीला दावा केला होता की, एक अज्ञात तरुण भीक मागण्याच्या बहाण्याने वसतिगृहात घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की, आरोपी एक ओळखीचा व्यक्ती आहे. तपास सुरू आहे. हेही वाचा Rajasthan Rape Case: जयपूरमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने 42 वर्षीय महिलेवर केला बलात्कार, फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू

देशात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातील गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळणे गरजेचे आहे. दरम्यान नुकतीच जयपूरमध्ये (Jaipur) एका 42 वर्षीय महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.