नोएडा मध्ये हलक्या सरींसह गारांचा पाऊस पडला. Watch Video
#WATCH नोएडा में हल्की बारिश के साथ ओले गिरे। pic.twitter.com/qgwiwQmEK5
— ANI_HindiNews (@AHindinews) March 9, 2021
नोएडा मध्ये हलक्या सरींसह गारांचा पाऊस ; 9 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच अशिया खंडातील आणि मुंबई शहरातील सर्वात दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असेल्या धारावी झोपडपट्टी परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची एक अंकी किंवा शून्य असलेली संख्या काल अचानक दोन अंकी झाली. आज दिवसभरात धारावीमध्ये COVID-19 संक्रमित 18 रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसातील आकडेवारीत गाठलेला हा उच्चांक आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये काल रेल्वेच्या एका इमारतीला आग लागली होती. या भीषण आगीमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान या आगीच्या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीररित्या जखमी असणार्यांसाठी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील कोलकाता मधील या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 4 फायर फायटर, 2 रेल्वे कर्मचारी आणि पोलिस एएसआय यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प काल पार पडला आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. एवढेच नव्हेतर, महिलांसाठीही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. याचा महिला वर्गांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा