Wall Collapse in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यातील (Sagar District) शाहपूर (Shahpur) मध्ये भिंत कोसळून (Wall Collapse) मुलांचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या अपघातात सुमारे 8 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. लहान मुले मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी जमली असताना अचानक मातीची भिंत कोसळली. (Gurugram Wall Collapse Video: गुरुग्राममध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळली, धक्कादायक Video आला समोर)
प्राप्त माहितीनुसार, हरदौल मंदिरात शिवलिंग बनवण्याचे व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, 4 ऑगस्ट रोजीही शिवलिंग बनविण्याचे काम सुरूच होते. सुट्टीचा दिवस असल्याने 8 ते 14 वर्षे वयोगटातील अनेक मुलेही शिवलिंग बनवण्यासाठी येथे पोहोचली होती. शिवलिंगाचे बांधकाम सुरू असताना अचानक मंदिर परिसरालगत असलेली पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. (हेही वाचा -Vasant Vihar Wall Collapsed: दिल्लीतील वसंत विहार परिसरात बांधकाम ठिकाणी भिंत कोसळली, एकाचा मृतदेह सापडला)
पहा व्हिडिओ -
Sagar के शाहपुर में दीवार गिरने से 8 बच्चों की मौत, घटनास्थल पर पहुंचे रहली विधायक गोपाल भार्गव #WallCollapse #Accident #Sagar #MadhyaPradesh #MPNews | @bhargav_gopal @BHARGAVABHISHEK pic.twitter.com/azjJnq6koP
— INH 24X7 (@inhnewsindia) August 4, 2024
सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये हरदौल मंदिरात शिवलिंग बनवण्याचे व भागवत कथेचे आयोजन चालू होते. याठिकाणी श्रावण महिन्यात येथे दररोज पहाटे शिवलिंग बनवले जात होते. रविवार सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. मुले शिवलिंग बनवत असताना मंदिराजवळची पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत अचानक कोसळली. भिंत थेट शिवलिंग बनवणाऱ्या मुलांवर पडली. या अपघातात अनेक मुले भिंतीखाली गाडली गेली, त्यापैकी आठ मुलांचा मृत्यू झाला आहे.