Vasant Vihar Wall Collapsed: दिल्लीतील वसंत विहार परिसरात बांधकाम ठिकाणी भिंत कोसळली, एकाचा मृतदेह सापडला
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी भिंती कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Vasant Vihar Wall Collapsed: दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी भिंती कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच, घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. दिल्ली अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या ढिगाऱ्याखाली शनिवारी पहाटे मजुराचा मृतदेह सापडला. ढिगाऱ्याखाली आणखी दोन मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी घडलेल्या घडनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष कुमार यादव असं मृताचे नाव आहे. (हेही वाचा- नवी मुंबईत डंपरने दुचाकीला चिरडले, अपघातात पोलिस हवालदाराचा मृत्यू, गुन्हा दाखल)
VIDEO | #Delhi: NDRF team recovers a body from the rubble of an under-construction wall that collapsed in Vasant Vihar area yesterday amid heavy rains.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/FrxEthVjkC
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2024 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

