Gurugram Wall Collapsed Video PC TWITTER

Gurugram Wall Collapse Video:  हरियाणा येथील गुरुग्राममध्ये शनिवारी भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा मन विचलित करणारा व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे. घटनेची तात्काळ माहिती बचावकार्याला देण्यात आली. बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांतर ढिगाऱ्याखालून अडकलेल्या ६ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी ५ जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, काही  जण भिंतीच्या आडोश्याला खुर्चीवर बसले होते. अचानक भिंत कोसळली आणि सगळे जण अडकले.