चेन्नई शहरातील उपनगरीय भागात राहणाऱ्या एका 62 वर्षीय विधवा महिलेने ABVP चे राष्ट्रीय अध्यक्ष सुब्बैया शनमुगम (Subbiah Shanmugam) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पार्किंगवरून झालेल्या वादानंतर सुब्बैया यांनी या महिलेच्या घराच्या दरवाज्याजवळ लघवी तसेच वापर केलेले मास्क फेकून दिल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने या प्रकारानंतर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 62 वर्षीय महिलेचा सुब्बैया शनमुगम यांच्यासोबत पार्किंगवरून वाद झाला होता. या महिलेने शनमुगम यांच्याकडून पार्किंग वापरल्याचा मोबदला मागितला होता. परंतु, शनमुगम यांनी या महिलेसोबत वाद घातला. त्यानंतर या महिलेने 11 जुलै रोजी या प्रकरणी अदमबक्कम पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा -Shivraj Singh Chouhan COVID19 Positive: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह)
Official Statement
NSUI is a running malicious, derogatory propaganda against Dr Subbiah Shanmugam with a fake video purported as harassment. pic.twitter.com/cvZes8xOhm
— ABVP (@ABVPVoice) July 24, 2020
दरम्यान, पीडित महिलेने पोलिसांना या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आणि फोटोज पोलिसांकडे सूपूर्त केले आहेत. परंतु, सुब्बैया शनमुगम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर एबीवीपीने स्पष्टीकरण दिलं आहे. एबीवीपीचे राष्ट्रीय महासचिव निधि त्रिपाठी यांनी सांगितलं की, सुब्बैया शनमुगम आणि पीडित महिलेमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता. मात्र, त्यानंतर या वादावर चर्चा करून उपाय काढण्यात आला होता.