Birbhum Blast

Lucknow Blast: उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे अवैध गॅस गोदामात स्फोट (Cylinder Blast) झाल्याची घटना उडाली आहे. या घटनेत एहसान आणि झीशान या दोन मुलांसह अनेक जण गंभीर जखमी (Children Injured) झाले आहेत. जखमींना तात्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर असून घटनेचा तपास सुरू आहे.

हे प्रकरण दुबग्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घराचा गॅस गोदाम म्हणून बेकायदेशीरपणे वापर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तेथे डझनभर गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. जे अपघाताचे कारण बनले. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. (हेही वाचा-Chhatarpur Murder: छतरपूरमध्ये विद्यार्थ्याने प्राचार्यांवर झाडली गोळी; शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील घटना)

दोन मुलांसह अनेक जण जखमी

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अवैध गॅस गोदामाच्या मालकाची ओळख आणि जबाबदारी निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सुरक्षेच्या निकषांवर आणि परिसरातील बेकायदेशीर कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.