Mumbai-Gujarat Trains Cancelled: वडोदरा विभागातील भरूच आणि अंकलेश्वर दरम्यान पुल क्रमांक 502 वर पाण्याची पातळी धोक्याचे चिन्ह ओलांडल्याने पश्चिम रेल्वेने सोमवारी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित सेवांसह 50 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरूच आणि अंकलेश्वर दरम्यान 17 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजल्यापासून UP आणि DOWN दोन्ही मार्गांवर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.
अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या प्रयत्नात, रेल्वेने व्यापक व्यवस्था केली. प्रवाशांना 18,000 पॅकेज केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, सुमारे 17,100 नाश्त्याची पाकिटे आणि सुमारे 7,500 चहाच्या सर्विंग्ससह अल्पोपाहार प्रदान करण्यात आला, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Gujarat Railway Services Disrupted: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार! रेल्वे सेवा विस्कळीत)
18 सप्टेंबर 2023 रोजी रद्द झालेल्या गाड्यांची यादी -
1. ट्रेन क्रमांक 22953 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद गुजरात एक्सप्रेस
2. गाडी क्रमांक 20901 मुंबई सेंट्रल - गांधीनगर राजधानी वंदे भारत एक्सप्रेस
3. गाडी क्रमांक 20902 गांधीनगर राजधानी – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस
4. ट्रेन क्रमांक 12953 मुंबई सेंट्रल - हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती तेजस एक्सप्रेस
5. ट्रेन क्रमांक 12009 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस
6. ट्रेन क्रमांक 12010 अहमदाबाद - मुंबई सेंट्रल शताब्दी एक्स्प्रेस
7. ट्रेन क्रमांक 12931 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद एसी डबल डेकर एक्सप्रेस
8. ट्रेन क्रमांक 12932 अहमदाबाद – मुंबई सेंट्रल एसी डबल डेकर एक्सप्रेस
9. ट्रेन क्रमांक १२९३३ मुंबई सेंट्रल - अहमदाबाद कर्णावती एक्सप्रेस
10. ट्रेन क्र. 12934 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेस
11. ट्रेन क्रमांक 82901 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेस
12. ट्रेन क्रमांक 82902 अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस
13. ट्रेन क्रमांक 12961 मुंबई सेंट्रल - इंदूर अवंतिका एक्सप्रेस
14. ट्रेन क्रमांक 12955 मुंबई सेंट्रल - जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस
15. ट्रेन क्रमांक 12956 जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
16. ट्रेन क्रमांक 19015 दादर - पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस
17. ट्रेन क्रमांक 20907 दादर - भुज सयाजीनगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस
18. ट्रेन क्रमांक 12471 वांद्रे टर्मिनस - श्री माता वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेस
19. ट्रेन क्रमांक 12925 वांद्रे टर्मिनस - अमृतसर पश्चिम एक्सप्रेस
20. ट्रेन क्रमांक 22971 वांद्रे टर्मिनस - पाटणा सुपरफास्ट एक्स्प्रेस
21. ट्रेन क्रमांक 22955 वांद्रे टर्मिनस - भुज कच्छ एक्सप्रेस
22. ट्रेन क्रमांक 22963 वांद्रे टर्मिनस - भावनगर टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस
23. ट्रेन क्रमांक 19019 वांद्रे टर्मिनस – हरिद्वार एक्सप्रेस
24. ट्रेन क्रमांक 19217 वांद्रे टर्मिनस - वेरावळ एक्सप्रेस
25. ट्रेन क्रमांक 22929 डहाणू रोड - वडोदरा सुपरफास्ट एक्सप्रेस
26. ट्रेन क्रमांक 22930 वडोदरा-डहाणू रोड सुपरफास्ट एक्स्प्रेस
27. ट्रेन क्रमांक 22954 अहमदाबाद-मुंबई मध्य गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस
28. ट्रेन क्रमांक 09172 भरूच-सुरत मेमू स्पेशल
29. ट्रेन क्रमांक 12930 वडोदरा - वलसाड इंटरसिटी
30. ट्रेन क्रमांक 09156 वडोदरा - सुरत मेमू स्पेशल
31. ट्रेन क्रमांक 09155 सुरत - वडोदरा मेमू स्पेशल
32. ट्रेन क्रमांक 09318 आनंद – वडोदरा मेमू स्पेशल
33. गाडी क्रमांक 09387 आनंद - डाकोर मेमू
34. गाडी क्रमांक 09388 डाकोर - आनंद मेमू
35. ट्रेन क्रमांक 09300 आनंद - भरुच मेमू स्पेशल
36. ट्रेन क्रमांक 09158 भरूच - सुरत मेमू स्पेशल
37. ट्रेन क्रमांक 09350 दाहोद - आनंद मेमू स्पेशल
38. ट्रेन क्रमांक 20960 वडनगर – वलसाड सुपरफास्ट एक्सप्रेस
39. ट्रेन क्रमांक 19036 अहमदाबाद - वडोदरा इंटरसिटी
40. ट्रेन क्रमांक 19035 वडोदरा – अहमदाबाद इंटरसिटी
41. ट्रेन क्रमांक 20955 सुरत-महुवा सुपरफास्ट एक्स्प्रेस
42. ट्रेन क्रमांक 19034 अहमदाबाद - वलसाड गुजरात क्वीन एक्सप्रेस
43. ट्रेन क्रमांक 01905 कानपूर – अहमदाबाद स्पेशल
44. गाडी क्रमांक 19425 बोरिवली – नंदुरबार एक्सप्रेस
45. ट्रेन क्र. 122657 मुंबई सेंट्रल - हापा दुरांतो एक्सप्रेस
46. ट्रेन क्रमांक 20959 वलसाड - वडनगर इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
47. ट्रेन क्रमांक 12929 वलसाड - वडोदरा इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
48. ट्रेन क्रमांक 09161 वलसाड - वडोदरा एक्सप्रेस
49. ट्रेन क्रमांक 09162 वडोदरा – वलसाड एक्सप्रेस
50. ट्रेन क्रमांक 19033 वलसाड - अहमदाबाद गुजरात क्वीन एक्सप्रेस
19 सप्टेंबर 2023 रोजी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या -
1. ट्रेन क्रमांक 09299 भरूच – आनंद मेमू स्पेशल
2. ट्रेन क्रमांक 09349 आनंद - गोधरा मेमू स्पेशल
3. ट्रेन क्र. 19426 नंदुरबार-बोरिवली एक्सप्रेस
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तथापि, नंतर ते कमी होईल. IMD नुसार, 20 सप्टेंबरपासून पूर्व भारतात पुन्हा एकदा पाऊस/वादळ आणि वादळ येण्याची शक्यता आहे.