बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्याकाही मध्य भारतात पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने बहुतांश नद्यांना पूर आले आहे. यात प्रामुख्याने तापी व नर्मदा नदीला महापूर आला आहे. (Narmada River) नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. बहुतांश रेल्वे नंदुरबार (Nandurbar) स्थानकावर खोळंबल्या आहेत. (हेही वाचा - Gujarat Rains Alert: गुजरातच्या जुनागढ, पोरबंदर आणि गीर सोमनाथ परिसरात 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा)

पाहा व्हिडिओ -

मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांना फटका बसत आहे. अनेक ठिकाणची रेल्वे सेवा विस्कळीत देखील झाली आहे. गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेच्या भरूच रेल्वे स्थानकावर रेल्वे पटरीवर पाणी आलं असून गुजरात राज्यात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या या नंदुरबार रेल्वे स्थानकावर गाड्या मागील अनेक तासापासून उभ्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

नर्मदा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यानंतरच या सर्व रेल्वे गाड्या सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.