Representational Image | (Photo Credits: IANS)

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये भाच्याने त्याच्या मामासह तिन्ही मुलांची हत्या केली. आरोपीने शनिवारी रात्री तीक्ष्ण धार असलेल्या शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केला. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. सुरुवातीच्या तपासणीत घटनेमागील मालमत्तेचा वाद उघडकीस आला आहे. पोलिसांच्या पाच पथकांनी मारेकऱ्याच्या अटकेसाठी तपास सुरू केला आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरही सखोल चौकशी सुरू आहे.

अयोध्येत निसारू गावात रमेश कुमार आणि त्याचा पुतण्या एकाच घरात राहत होते. नवासे जमीनीवरून मामा आणि पुतण्या यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. शनिवारी रात्री उशीरा भाच्याने आपला मामा राकेश कुमार आणि मामी ज्योती यांच्यासह तीन मुलांची (एक मुलगी आणि दोन मुले) यांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गावकरी एकत्र आले आणि त्यांनी स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. (वाचा - गाझियाबाद: अपहरण केलेल्या मुलांची 5 ते 10 लाख रुपयांत विक्री, पोलिसांकडून 11 आरोपींना अटक)

माहिती मिळाल्यानंतर सुमारे तासाभरानंतर प्रभारी निरीक्षक राहुल कुमार हे पथकांसह घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेश पांडे म्हणाले की, पाच जणांच्या हत्येचा आरोपी असलेला भासा आणि मामा एकाच घरात राहत होते. प्राथमिक चौकशीत संपत्तीचा वाद समोर आला आहे. आरोपींच्या कुटूंबियांची चौकशी केली जात असून पोलिसांच्या पाच पथकांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, घटनास्थळी जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचत आहेत. सर्व दृष्टीकोनातून, तपासणीनंतर कारवाई केली जाईल, तपासणीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली.