Andhra Pradesh: विजयवाडा येथे डॉक्टरांसह कुटुंबातील 5 जण मृतावस्थेत आढळले; 4 जणांच्या शरीरावर जखमांच्या खुणा
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विजयवाडा (Vijayawada) येथे एका डॉक्टरसह आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली. यासंदर्भात माहिती देताना विजयवाडा पूर्वेचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) अधिराज सिंह राणा यांनी सांगितले की, चार जणांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या, तर कुटुंबातील एक जण फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. मंगळवारी सकाळी मृतदेह पाहिल्यानंतर सोमवारी रात्री हा गुन्हा घडला असावा, असा संशय सिंह यांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, डी श्रीनिवास (40) लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर त्यांची पत्नी डी उषा राणी (38), दोन अल्पवयीन मुले - एक मुलगा आणि एक मुलगी - आणि त्यांची आई डी रामनम्मा (70) यांचा गळा चिरलेला आढळला. (हेही वाचा -Jharkhand: हजारीबाग येथे डीआयजीच्या निवासस्थानी कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या)

ऑर्थोपेडिक सर्जन श्रीनिवास यांनी आधी चौघांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली का? याचा तपास पोलीस करत आहेत. राणा यांनी पीटीआयला सांगितले की, डी श्रीनिवास यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता का? याची पुष्टी आम्ही करत आहोत. नुकतेच त्यांनी आपले हॉस्पिटल विकले होते. (वाचा - NEET Aspirant Commits Suicide in Kota: 'सॉरी पापा, यावेळीही माझी निवड होणार नाही,' कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या)

डीसीपीच्या म्हणण्यानुसार, पोलीस श्रीनिवासच्या आर्थिक मुद्द्यांचाही शोध घेत आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री, मृत डॉक्टरांनी आपल्या कारच्या चाव्या शेजाऱ्याला दिल्या आणि त्यांनी त्या चाव्या आपल्या भावाला देण्याची विनंती केली. हे पाचही जण बाहेर जात असल्याचे त्यांनी शेजाऱ्याला सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये हत्येचा आणि सीआरपीसी कलम 174 अन्वये आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.