Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

NEET Aspirant Commits Suicide in Kota: राजस्थान (Rajasthan) मधील कोटा (Kota) येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. भरत राजपूत (20) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो धौलपूरचा रहिवासी होता. भरत कोटा येथे राहून NEET ची तयारी करत होता. खासगी कोचिंगला प्रवेश घेतल्यानंतर तो येथे शिकत होता. भरत हा त्याचा भाचा रोहितसोबत तालमंडी खासगी क्षेत्रातील एका घरात पीजीमध्ये राहत होता.

पोलिसांना भरतच्या खोलीतून दोन ओळींची सुसाईड नोटही सापडली असून त्यामध्ये 'सॉरी पापा, यावेळीही माझी निवड होणार नाही,' असे लिहिले आहे. जवाहर नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामनारायण यांनी सांगितले की, भरतची दोनही वेळा नीट परीक्षेत निवड झाली नाही. यावेळीही आपली निवड होणार नाही, अशी भीती त्यांला वाटत होती. (हेही वाचा -AIIMS New Delhi Hostel Suicide Case: नवी दिल्ली एम्स च्या हॉस्टेल मध्ये नर्सिंगच्या 21 वर्षीय विद्यार्थीनीची अभ्यासाच्या ताणातून आत्महत्या)

भरतचा भाचा रोहितने पोलिसांना सांगितले की, भरतने आधीच दोनदा तयारी केली होती, मात्र त्याची निवड झाली नाही. त्याची NEET परीक्षा 5 मे रोजी होती. त्यापूर्वी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, भरत NEET ची तयारी करत होता. यंदाचा त्याचा हा तिसरा प्रयत्न होता. पहिली दोन वर्षे त्याने कोटा येथे राहून तयारी केली, पण त्यांची निवड होऊ शकली नाही.

पुन्हा तिसऱ्या वर्षी तो तयारीसाठी कोटा येथे आला. उपनिरीक्षक रामनारायण यांनी सांगितले की, सकाळी 11.00 वाजता आम्हाला माहिती मिळाली की, कोचिंगच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला आहे. भरत आणि त्याचा भाचा दोघेही एकाच खोलीत राहत होते. रोहित केस कापण्यासाठी गेला असता भरतने आत्महत्या केली.

दरम्यान, रोहितने सांगितले की, तो कधीही अभ्यासाच्या तणावाबाबत बोलला नाही. कोचिंग टेस्टमध्येही त्याला चांगले गुण मिळत होते. भरत सोमवारी रात्री मोबाईल पाहात होता. अभ्यास केल्यानंतर मी काही वेळ माझ्या मोबाईलमध्ये घालवला आणि मग मी झोपी गेलो. सकाळी 9.30 च्या सुमारास मी उठलो. (वाचा -Uttar Pradesh Shocker: पतीने आपल्या आईला दिले 200 रुपये; चिडलेल्या पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या)

कोटोमध्ये गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. रविवारी संध्याकाळी हरियाणातील रोहतक येथे राहणाऱ्या 20 वर्षीय सुमितनेही वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. सोमवारीच सुमितच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. सुमितचीही 5 मे रोजी NEET परीक्षा होती आणि त्याला सोमवारीच घरी जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. या वर्षातील ही दहावी घटना आहे. 2023 मध्ये कोटामध्ये 29 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या.