File Image (Representational Image)

Uttar Pradesh Bhadohi Rape Case: उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस (Hathras) आणि त्यानंतर बलरामपुर (Balrampur) जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर संपूर्ण देशात संपात व्यक्त करण्यात आला. या घटना ताज्या असतानाचं राज्यात बलात्काराच्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे. उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात (UP's Bhadohi District) 44 वर्षीय दलित महिलेवर (Dalit Woman) चार जणांकडून सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना पोलिस अधीक्षक राम बदन सिंह यांनी सांगितलं की, या महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ज्ञानपूर भागात ही घटना घडली. शनिवारी ही महिला पैसे काढल्यानंतर बँकेतून परत येत होती. त्यावेळी तिच्या नवऱ्याने आपले दोन मित्रांना बायकोला घरी सोडण्यास सांगितले. परंतु, या दोन मित्रासह आणखी दोन जणांनी आपल्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. (हेही वाचा - संतापजनक! डोंबिवलीत 9 वर्षीय चिमुरडीवर जन्मदात्या बापानेचं केला बलात्कार; पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर नराधम पित्याला अटक)

रविवारी ज्ञानपूर पोलिस ठाण्यात या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे. दरम्यान, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.