Dog | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Bengaluru Shocking: बेंगळुरूमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIA) एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्याला गाडीमध्ये लॉक केलं. त्याने कार चुकीच्या पार्किंग लेनमध्ये सोडली. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) चे जवान तिथे पोहोचले तेव्हा त्यांना काळ्या फियाटच्या खिडक्या बंद असलेल्या दिसल्या. कारमध्ये एक कुत्रा श्वास घेण्यासाठी तरफडत असल्याचा त्यांना दिसला. त्यानंतर सीआरएसएफ जवानांनी कारच्या काचा फोडल्या आणि कुत्र्याचा जीव वाचवला.

मुंबईमार्गे कोईम्बतूरला जाणाऱ्या रात्री 8.50 च्या फ्लाइटचे तिकीट असलेल्या प्रवाशाने दुपारी 4 च्या सुमारास आपली काळी फियाट कुत्र्यासह पार्क केली. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अधिकार्‍यांना कुत्रा गुदमरत असून त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे आढळले. (हेही वाचा -Bengaluru Uber Driver Attacks Woman: उबर कॅब चालकाचा महिलेवर हल्ला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

CISF अधिकार्‍यांनी या पाळीव कुत्र्याचे प्राण वाचवले. अधिकाऱ्यांना चुकीच्या पार्किंग लेनमध्ये कार पार्क केल्याचा कॉल आला होता. त्यांनी कारची खिडकी तोडून त्याचा जीव वाचवला आणि नंतर प्राण्याला पुढील उपचारासाठी आश्रयस्थानात पाठवले.

विक्रम रामदास लिंगेश्वर असं या प्रवाशाचं नाव आहे. विक्रमवर प्राणी क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि IPC 429 (प्राणी मारणे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशाला त्याच्याविरुद्ध आवश्यक कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीनंतर प्रवाशाची जामिनावर सुटका करण्यात आली.