coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशात कोरोनाचा (Corona Virus) कहर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात (India) तिसऱ्या लाटेची (third wave) भीती अद्याप कायम आहे. आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा भारतात कोरोनाचे 41 हजारहून अधिक नवीन रुग्ण (Patient) सापडले आहेत. रुग्णवाढीचे सत्र सुरुच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोना व्हायरसची 41,649 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत 593 बाधितांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 37,291 लोक कोविड -19 संसर्गातून कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 4,08,920 इतकी आहे.  देशात कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 3,07,81,263 झाली आहे. तर विषाणूमुळे मृतांची संख्या 4,23,810 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात 46,15,18,479 लोकांना कोविड लसीचा (Covid vaccine) डोस देण्यात आला आहे. देशात लसीकरण (Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. भारतात गुरुवारी 44,230 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 555 लोकांचा मृत्यू झाला. या दरम्यान 42,360 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले. विशेष म्हणजे केरळमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे चिंताजनक आहेत.  देशातील कोरोनाच्या एकूण नवीन प्रकरणांपैकी निम्मे प्रकरण केवळ केरळमध्ये नोंदवले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळमध्ये गुरुवारी 20 हजारांहून अधिक कोरोनाची नोंद झाली आहे. यापूर्वी बुधवारी 22,056 आणि मंगळवारी 22,129 लोक केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

आतापर्यंत देशात गर्भवती महिलांसाठी विशेष लसीकरण सत्रात आतापर्यंत 2.27 लाखांहून अधिक गर्भवती महिलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये लसीचा जास्तीत जास्त डोस 78 हजार 838 गर्भवती महिलांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 6,600 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमित लोकांची एकूण संख्या 62,96,756 झाली आहे. तर आणखी 231 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 1,32,566 वर पोहोचली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 77,494 वर आली आहे. आतापर्यंत राज्यात 60,83,319 लोकांनी या कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे.