'आमचा एकही आमदार 'बिकाऊ' नाही'- मध्य प्रदेशचे मंत्री जितू पटवारी; 4 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Mar 04, 2020 11:39 PM IST
बलात्काराच्या आरोपामध्ये अडकलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत त्यांनी बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती केली आहे. 9 मार्च रोजी नरेंद्र मेहता यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. भाजपच्या एका नगरसेविकेने मेहता यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कारण 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारकडून विचार करण्यात येत आहे. घरगुती वीज वापर कर्त्यांसाठी मोफत वीज देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
कोरोना व्हायरसमुळे राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधील 65 हजार 621 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच 149 प्रवासी कोरोनाचे निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या बाजूला तेहरानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या सर्वांची कोरोना संदर्भातील तपासणी करण्यात आल्यानंतरच भारतात आणले जाणार आहे. जवळजवळ 2 हजार नागरिक येथे अडकले असून कोल्हापूर आणि अकलूज येथील सुद्धा काही रहिवाशी आहेत.