Bombay High Court (Photo Credits: Twitter/ ANI)

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) विरोधात 2018 मध्ये मे आणि जुलै महिन्यात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी नीरव मोदी याच्या प्रत्यर्पणासाठी आग्रह केला होता. तर आता  नीरव मोदी याच्या मुलाने वडिलांच्या संपत्तीचा होणारा लिलाव थांबवण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. नीरव याच्या संपत्तीचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार आहे. नीरव याचा मुलगा रोहिन मोदी याने कोर्टात यानी एक याचिका दाखल केली आहे.

त्यानुसार रोहिन याने याचिकेत असा दावा केला आहे की, ईडीकडून ज्या महागड्या पेंटिंग्स जप्त केल्या आहेत त्या वडिलांच्या नसून रोहिन ट्रस्टच्या आहेत. रोहिन या ट्रस्टचे प्रमुख आहेत.रोहिन याने हायकोर्टाला ईडी आणि खासगी लिलाव संस्था सॅफरनआर्ट यांना 5 मार्चला होणारा लिलाव थांबण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश बीपी धर्माधिकारी आणि न्यायाधीश एआर बोरकर यांच्या खंडपीठाकडून यावर आज सुनावणी करण्यात येणार आहे.(PNB Scam: नीरव मोदी ने PNB ला व्याजासहित 7300 कोटी रुपये देण्याचा DRT चा आदेश)

दरम्यान, 15 मौल्यवान पेटिंग्ससह हिरेजडीत घड्याळ, हॅंन्ड बॅग आणि काही महागड्या कार यांची लाईव्ह आणि ऑनलाईन पद्धतीने लिलावात झळकवणार आहेत. लंडन मधील तुरुंगात नीरव मोदी याला ठेवण्यात आले आहे. तसेच मेहुल चोक्सी याच्यावर पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने नीरव मोदी याचे मुंबईतील बंगल्यांमधील महागड्या वस्तू जप्त केल्या असून त्यांचा लिलाव 5 मार्चला होणार आहे.