3 terrorists killed in Jammu & Kashmir (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीर मधील शोपिया (Shopian) आणि हंदवाडा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात आज (28 मार्च) सकाळी चकमक झाली. दहशतवाद्यांविरुद्ध सुरु असलेल्या ऑपरेशन ऑलआऊट (Operation All Out) अंतर्गत भारतीय सेनेने (Indian Army) मोठी मोहीम हाती घेतली आहे. यात सेनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. शोपियातील चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  तर हंदवाडा येथे दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले असून त्यांच्यात चकमक सुरु आहे.

या भागात 4-6 दहशतवादी लपलेले असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनीही गोळीबार करत दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले. त्यानंतर त्या संपूर्ण परिसराला घेराव घालून त्यांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली.

ANI ट्विट:

बुधवारी शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्याने गोळी झाडून एका तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाचे नाव तनवीर अहमद डार असे होते.