Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago
Live

बॉलिवूड अभिनेत्री Sunny Leone चे नाव ‘चुकून’ कोलकाताच्या एका महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत दिसले; 27 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Ashwjeet Jagtap | Aug 27, 2020 11:55 PM IST
A+
A-
27 Aug, 23:44 (IST)

बॉलिवूड अभिनेत्री Sunny Leone चे नाव ‘चुकून’ कोलकाताच्या एका महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत दिसून आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

27 Aug, 23:19 (IST)

कोविड-19 लॉकडाऊन उल्लंघन करून, बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील पक्ष कार्यालयाजवळ बैठक आयोजित केल्याबद्दल AIMIM च्या 200 नेत्यांविरुद्ध आणि कार्यकर्त्यांविरूद्ध FIR नोंदविला आहे.

27 Aug, 22:49 (IST)

कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने 7 मे रोजी 'वंदे भारत' मिशन सुरू केल्यावर, 12 लाखाहून अधिक भारतीय परदेशातून परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

27 Aug, 22:45 (IST)

असम राज्यातील तेजपूर येथे भूकंप झाला आहे. भूकंपमापक यंत्रावर या भूकंपाची 3.4 रिस्टर स्केलची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू तेजपूर येथे होता.

27 Aug, 21:56 (IST)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी 'मीडिया ट्रायल' स्थगित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, यामुळे चौकशीला बाधा येऊ शकते अशी शक्यता.

27 Aug, 21:42 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,773 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 89,090  झाली आहे. तर 1,680 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,995 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 4,26,550 झाली असून, आज 6,092 टेस्ट घेण्यात आल्या.

27 Aug, 21:16 (IST)

कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. नागभारणा यांनी बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. त्यामध्ये ते म्हणाले की, बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो स्थानक आणि गाड्यांमधून हिंदी चिन्ह काढून टाकावे आणि मेट्रो ट्रेन आणि स्थानकांमधील हस्ताक्षर कन्नड व इंग्रजीमध्ये असावेत.

27 Aug, 20:48 (IST)

गोव्यात कोरोनाचे आणखी 456 रुग्ण आढळून आले आहेत.

27 Aug, 20:39 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 1746 रुग्ण आढळून आल्याने आकडा 47,836 वर पोहचला आहे.

27 Aug, 20:31 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 9386 रुग्ण आढळून आले असून 7866 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Load More

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. राज्यात बुधवारी संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 14,888 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 295 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या आता 7,18,711 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 5,22,427 आणि रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 1,72,873 जाणांचाही समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

तसेच, सर्व राज्य लोकसेवा परीक्षा कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे नवीन वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, असे सांगितले आहेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात जेईई आणि नीटच्या परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात 5 मजली इमारत कोसळली होती. तब्बल 40 तासांच्या नंतर याचे बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता या दुर्घटनेमध्ये आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार व पाच वर्षांच्या दोन लहान मुलांचे पालकत्व नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यातच सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनानंतर रिया चक्रवर्ती सुमारे 45 मिनिटे कपूर रुग्णालयाच्या शवगृहात उपस्थित होती. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर रुग्णालय व मुंबई पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच रिया चक्रवर्तीला कोणत्या आधारावर शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली होती? याबाबतही संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे. यामुळे हे प्रकरण आणखी नवीन वळण घेईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

सध्या संपूर्ण भारतात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात मोठी घट झाल्याची पाहायला आहे. बुधवारी पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. दरम्यान, काहीजणांनी घराच्या घरीच विसर्जन केले आहे. तर, काहींनी आपल्या शेजारी असलेल्या कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले आहे. यंदाचा गणेशोत्सव लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागत असल्याने भक्तांमध्ये नाराजी वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या


Show Full Article Share Now