जर सरकारने कृषी कायदे रद्द केले नाहीत तर शेतकरी संसदेला घेराव घालतील- राकेश टिकैत; 23 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Ashwjeet Jagtap
|
Feb 23, 2021 10:56 PM IST
भारतामध्ये मागील काही दिवस कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असतानाच आता मुंबई सह महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मात्र, रविवारी (21 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा कोविड 19 गाईडलाईनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये नागरिकांनी मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेआवाहन केले आहे.
लॉकडाऊन हे कोणालाच नको आहे, परंतु तरीही विविध भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. लोकांच्या या निष्काळजी वृत्तीमुळे आता मुंबई पोलिसांनाही विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंड आकरण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात सोमवारी (22 फेब्रुवारी) 5 हजार 210 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन 5 हजार 035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 99 हजार 982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53 हजार 113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.