Two-Storey Building Collapses In Meerut: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील झाकीर कॉलनी भागातील गल्ली क्रमांक 6 जवळ दोन मजली घर कोसळले (Building Collapses). या इमारतीखाली आठ ते दहा जण गाडले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचाव पथक घटनास्थळी उपस्थित असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
घटनास्थळी अग्निशमन विभाग मदतकार्यात गुंतले आहेत. मात्र, अंधारामुळे आणि पावसामुळे बचाव आणि मदत कार्यात अडचणी येत आहेत. याशिवाय लहान रस्त्यांमुळे बचाव आणि मदतकार्यासाठी मोठी मशिन पोहोचू शकत नाहीत. (हेही वाचा -Delhi Building Collapse: दिल्लीतील नबी करिम परिसरातील इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू)
मेरठमध्ये दोन मजली इमारत कोसळली, पहा घटनास्थळावरील दृश्य -
थाना लोहिया नगर क्षेत्र के ज़ाकिर कॉलोनी स्थित निम्मो गाजी का मकान बारिश के चलते भरभरा कर गिर गया लगभग 12 लोग मलबे मैं दबे रेस्क्यू ऑपरेशन जारी...@ChiefSecyUP@UPGovt@Uppolice
@meerutpolic pic.twitter.com/h5nBwt8cgt
— Shanu Bharty (@riyaz_shanu) September 14, 2024
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली अपघाताची दखल -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेरठ जिल्ह्यातील लोहियानगर येथे इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेची दखल घेतली असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.