Grill Collapses At Blue Sapphire Mall In Noida: ग्रेटर नोएडामधील ब्लू सॅफायर मॉलमध्ये ग्रिल कोसळून 2 जणांचा मृत्यू (Watch Video)
Grill Collapses At Blue Sapphire Mall (PC - X/@SachinGuptaUP)

Grill Collapses At Blue Sapphire Mall In Noida: ग्रेटर नोएडा (Greater Noida) पश्चिम येथील ब्लू सॅफायर मॉल (Blue Sapphire Mall) मध्ये लोखंडी ग्रील कोसळल्याने (Grill Collapses) दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत मृत्युमुखी पडलेले दोघे मजूर होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खाली उभ्या असलेल्या दोघींच्या डोक्याला ग्रील लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बिसरख पोलिसांनी सांगितले की, हरेंद्र भाटी (वय, 35) आणि शकील (वय, 35) रा. विजय नगर, गाझियाबाद अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफेत ब्लास्ट होण्यापूर्वीचा व्हिडिओ आला समोर, संशयिताने ठेवली बॉम्ब बॅग)

पहा व्हिडिओ -

व्हिडिओमध्ये, दोन मृत्यूमुखी पडलेले दिसत आहे. यात दोघे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसतात. या घटनेनंतर, या व्यक्तींच्या मदतीसाठी उपस्थितांनी धाव घेतली आणि त्यांना घटनास्थळापासून दूर नेले.

ग्रेटर नोएडामधील यापूर्वीच्या घटना -

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 37 मध्ये झालेल्या एका अपघातात वेगवान पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारचे नियंत्रण सुटले. आणि कार रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयात धडकली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातात कार आणि टॉयलेटचे दोन्ही नुकसान झाले आहे.